वाढवणा पोलिसांची डोंगरशेळकी तांड्यावरील अवैध हातभट्टीवर धाड

वाढवणा ठाणे अंतर्गत येणार्‍या डोंगरशेळकी तांड्यावर अवैध हातभट्टी दारू बनवून विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून वाढवणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांनी 23 नोव्हेंबर रोजी पहाटे पोलीस उपनिरीक्षक व सहकारी पोलिसाचे पथक नेमून डोंगर शेळकी तांड्यावर तीन ठिकाणी धाड टाकली. धाडीत एका इसमासह दोन महिलांवर दारु बंदी अधिनियमानुसार वाढवणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांजवळ 1600 लिटर (प्रति लिटर 60 रुपये) एकूण रक्कम 96000 रुपयांचा रसायन हातभट्टी दारू बनवण्यासाठी व चोरट्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगळ्यावरून तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार मुक्ताबाई चंद्रकांत राठोड (60) रा. डोंगर शेळकी ता. उदगीर यांच्या कडे मौजे डोंगर शेळकी येथे 600 लिटर रसायन 36000 रुपये किंमतीचा मिळाला म्हणुन कलम 65(फ )महाराष्ट्र दारू बंदी अधिनियमानुसार मुक्ताबाई चंद्रकांत राठोड हिच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कलम 65(फ) महाराष्ट्र दारू बंदी अधिनियमांनुसार अनुसया अशोक पवार (38) रा. डोंगर शेळकी तांडा ता.उदगीर हिच्याकडे 400 लिटर प्रति लिटर 60 रुपये प्रमाणे 24000 रुपये किमतीचा माल मिळाल्याने फिर्यादी अक्केमोड यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कलम 65 (फ) महाराष्ट्र अधिनियमानुसार फिर्यादी राजमोहम्मद शेख पोलीस हवालदार यांच्या फिर्यादीनुसार राम काशिनाथ राठोड (48) रा. डोंगर शेळकी तांडा ता. उदगीर यांच्याकडे 600 लिटर रसायन एकूण 36000 रुपये किंमतीचे मिळाल्याने वाढवणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरील तिघांजवळून एकूण 1600 लिटर हातभट्टी तयार करण्याचे रसायन एकूण किंमत 96000 रुपये किमतीचे रसायन मिळून आले. ही कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास वाढवणा पोलीस करीत आहे.