ज्येष्ठ रंगकर्मी लक्ष्मण काटे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
laxman-kate-solapur

सामना प्रतिनिधी । सोलापूर

सोलापूरमधील ज्येष्ठ रंगकर्मी लक्ष्मण काटे यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. एक संपूर्ण रंगकर्मी म्हणून त्यांचा लौकिक नाट्यक्षेत्रात होता.

रंगभूषा, वेशभूषा, अभिनय, नाट्यलेखक, दिग्दर्शक, नेपथ्य अशा सर्व भूमिकेतून त्यांनी नाट्य रसिकांना रंगभूमीसोबत जोडून ठेवले आणि आपली एक वेगळी छाप उमटवली होती. पुस्तके खरेदी करून वाचणे हा त्यांचा आवडता छंद होता. कला क्षेत्रातील अनेक कलावंतांचे आत्मचरित्र त्यांच्या संग्रही ठेवले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा त्यांचा परिवार आहे.