
तामीळनाडूमध्ये राज्यपाल आर. एन. रवी यांच्याविरोधात सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झालेले असतानाच डीएमके नेते शिवाजी कृष्णमूर्ती यांनी राज्यपालांविरोधात शिवराळ भाषा वापरल्याचे समोर आले आहे. डीएमकेने त्याची गंभीर दखल घेतली असून कृष्णमूर्ती यांना तत्काळ पक्षातून निलंबित केले आहे.
डीएमकेच्या एका कार्यक्रमात बोलताना गुरुवारी शिवाजी कृष्णमूर्ती यांनी राज्यपालांबाबत शिवराळ भाषा वापरली होती. त्यामुळे भाजपने कृष्णमूर्ती यांच्याविरोधात आंदोलन करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. तसेच पोलीस महासंचालकांना पत्र पाठवत कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे डीएमकेने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
























































