
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैऐवजी एक-दोन दिवसांनी बोलावण्यात येईल. या अधिवेशनाची तारीख विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात येईल. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने विधान भवनात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून बोलावण्यात आले आहे. पण त्याच दिवशी राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. त्यामुळे 18 तारखेऐवजी अधिवेशनाची तारीख एक-दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन 3 जुलै रोजी बोलावण्यात आले होते. आज हे अधिवेशन संस्थगित करण्यात आले, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी केली.



























































