बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

57
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । जिंतूर

तालुक्यातील किन्ही येथे शेतामध्ये काम करित असताना बिबट्याने अचानक हल्ला केल्याने किन्ही येथील शेतकरी लक्ष्मण विश्वनाथ वाकळे (६५) हे गंभीर जखमी झाले. ही घटना सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.

तालुक्यातील किन्ही येथील लक्ष्मण वाकळे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करीत असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांनी जोरदार प्रतिकार करत तेथून पळ काढला. ही घटना कोठा बदनापूर व किन्ही परिसरातील शेतकरी, नागरिकांना समजताच त्यांनी वाकळे यांच्या शेतकडे धाव घेतली. जखमी वाकळे यांना उपचारार्थ येलदरीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी परभणीला येथे पाठवण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रकरणाची शहानिशा करून वन विभागाला माहिती दिली. किन्ही येथील सरपंच संतोष दौंड, यांच्यासह येलदरी येथील काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाने परभणी येथील कर्मचारी व बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा मागवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या