
सामना ऑनलाईन । इगतपुरी
इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथे रविवारी सकाळी पोल्ट्री फार्मच्या छतावरून बिबट्या आत पडला आणि पोल्ट्री मालकासह कोंबड्यांची एकच घाबरगुंडी उडाली. बिबट्याला घाबरून पोल्ट्रीतील तब्बल दीड हजार कोंबड्या मेल्या. अखेर चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.

























































