
बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध सौताडा धबधबा आणि प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्त येत आहेत. जामखेड पासून सौताडा धबधबा दहा किलोमीटर अंतरावर आहे. जामखेड येथून एक कुटुंब दर्शनासाठी गाडीतून गुरूवारी दुपारी चार वाजता सौताडा येथे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी पांडव वस्ती समोरील नदीच्या वळणावर अचानक गर्द झाडीतून अचानक बिबट्या समोर आल्याने घाबरगुंडी उडाली.
सायंकाळच्या सुमारास कुटुंबासह चारचाकी गाडीने घाटाखाली रस्त्याने जात असताना गाडीसमोर अचानक बिबट्याचे आगमन झाले. बिबट्या गुरगुरत असल्याने दहिफळे कुटुंबीय घाबरले होते. ताबडतोब गाडीच्या काचा बंद केल्याने सगळे सुरक्षित राहिले. हॉर्न वाजवल्यानंतर बिबट्या झाडीत पळून गेला. गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने बिबट्या घाबरून पळून गेला. त्यानंतर परिसरातील नागरिकांना घडलेल्या घटनेची माहिती देत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सौताडा परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच रामेश्वर परिसरात पथक पाठवून पाहणी केली असता, बिबट्याचे ठसे आढळून आले.































































