चेहरा तजेलदार दिसण्यासाठी वापरा नारळाचे पाणी, जाणून घ्या फेस मास्क बनवण्याची सोपी पद्धत

नारळाच्या पाण्यातील पौष्टिक गुणधर्मामुळे फक्त शरीराला फायदा होतो, असे नाही तर सौंदर्यवाढीसाठीही नारळाचे पाणी अत्यंत फायदेशीर ठरते. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. काळपट दिसू लागते. काहीवेळा निस्तेजही दिसते. अशा वेळी नारळाच्या पाण्याचा तयार केलेला फेसपॅक चेहऱ्याला लावल्यास चेहरा तजेलदार आणि तुकतुकीत व्हायला निश्चतच मदत मिळू शकते.

नारळ पाण्यापासून फेस मास्क तयार करण्याची कृती अत्यंत सोपी आहे. याकरिता एका भांड्यात नारळाचे पाणी घ्या. त्यामध्ये गुलाब जल व्यवस्थित मिसळा. आता हा मास्क कापसाच्या बोळ्याने चेहरा आणि त्वचेवर लावा. त्यानंतर काही वेळा मास्क सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. नंतर चेहरा स्वच्छ कापडाने पुसून चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा.

– नारळ पाणी आणि गुलाब पाण्यापासून तयार केलेल्या फेसमास्कमुळे त्वचा चमकदार होते. हा मास्क त्वचेला हायड्रेट ठेवतो.
– नारळाचे पाणी शरीरातील पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते. त्वचेवर येणारे काळे डाग, मुरुम जास्त असतील तर हा मास्क दिवसातून दोनदा चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्याला नवीन ग्लो मिळेल.