थकवा, चिडचिडेपणा आणि अशक्तपणा जाणवतोय, आहारात ‘या’ फळाचा करा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिवाळ्यात बाजारात ऋतुमानानुसार विविध प्रकारची फळे विक्रीसाठी येतात. निरोगी आरोग्यासाठी या फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. अनेक फळांपैकी एक फळ म्हणजे सीताफळ. आरोग्यासाठी सीताफळ वरदान समजले जाते. जाणून घेऊया सीताफळ खाण्याचे फायदे.

– थंडीच्या दिवसांत पचनक्रिया बिघडते. अशावेळी सीताफळ खाल्ल्याने फायदा होतो. सीताफळातील कॉपर आणि फायबर असते. यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते तसेच हे फळ खाल्ल्याने पचनक्रियेशी निगडीत अनेक समस्यांपासून सुटका होते.

– शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यासाठी सीताफळ खावे. यातील अँण्टिऑक्सिडंट रक्तशुद्ध करण्यासाठी मदत करतात. यामुळे बॉडी डिटॉक्स होते. किडनीच्या आरोग्याकरिता सीताफळ खाणे फायदेशीर ठरते.

– सीताफळात जीवनसत्त्व ए असते. यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारायला मदत होते. डोळे निरोगी राहण्याकरिता सीताफळ खाणे गुणकारी आहे.

– आजकालच्या अत्यंत व्यस्त जीवनशैलीमुळे चिडचिडेपणा वाढतो. बहुतांश लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. अशावेळी सीताफळाचे सेवन केल्यास फायदा होतो. यामधील जीवनसत्त्व बीमुळे डोके शांत राहाते. चिडचिडेपणा, नैराश्यापासून दूर राहण्याकरिता सीताफळाचा आहारात समावेश करावा.

– श्वासाच्या विकारांवर सीताफळ फायदेशीर आहे. अस्थमा असलेल्या रुग्णांना सीताफळ खाल्ल्याने आराम मिळतो. यामध्ये जीवनसत्त्व बी6 असते. यामुळे अस्थम्याचा धोका कमी होतो.

– हिवाळ्यात संधिवाताशी संबंधित आजार अनेकदा बळावतो. अशावेळी सीताफळाचे सेवन केल्याने आराम मिळतो. यामधील पोषक तत्त्वे जळजळ कमी करतात. हाडांचे दुखणेही सीताफळ खाल्ल्याने कमी होऊ शकते.

– सीताफळात पोटॅशियम जास्त प्रमाणात असते. यामुळे थकवा, अशक्तपणा यासारखे त्रास दूर होतात. रक्ताभिसरण सुधारायलाही सीताफळ खाल्ल्याने मदत होते.

– मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सीताफळामध्ये आहे. याकरिता ह्रदयाच्या आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ खावे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

– ज्यांचे वजन कमी आहे किंवा सतत अशक्तपणा जाणवत असल्यास सीताफळ खावे. यामुळे त्वरित एनर्जी मिळते. उत्साह वाढतो. वजन वाढण्याकरिताही आहारात सीताफळाचा समावेश केल्यास फायदा होतो.