मुलाच्या शिक्षणासाठी आयुष्यभराची कमाई दिली, त्याने केले असे कृत्य आईने घेतली कोर्टात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चायनामध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. एका माऊलीने आयुष्यभर काबारकष्ट करुन मुलाच्या शिक्षणासाठी फी पाठवली. मात्र मुलाने ती शिक्षणावर खर्च न करतका प्रेयसीवर उडवली. हा प्रकार महिलेला समजल्यानंतर संतापलेल्या महिलेने मुलाविरोधात न्यायालयात धाव घेतली,

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही घटना चीनच्या सिचुआन प्रांतातील असून लुईचा असे त्या महिलेचे नाव आहे. लुईचा हिचा तिच्या पतीसोबत लहान वयात घटस्फोट झाला होता. त्यामुळे त्यांनी त्याला एकट्याने वाढवले. पुन्हा लग्न करण्यापूर्वी त्यांनी त्यांची आयुष्यभराची कमाई 500,000 युआन म्हणजेच सुमारे 57 लाख रुपये त्यांचा मुलगा शिओवेईकडे दिले.जेणेकरून भविष्यात नवऱ्याला हे पैसे द्यावे लागणार नाहीत. त्यांनी मुलाला सांगितले आहे ती तुझ्या शिक्षणासाठी वापर, परदेशात जाऊन शिक्षण घे . शिवाय त्याने चांगले शिक्षण घेतले तर त्याला आणखी 500,000 युआन देण्याबाबतही सांगितले.त्याने विद्यापीठात प्रवेश घेतला.

लुई आपल्यासोबत कायम बँकेचे पासबुक ठेवायची.तिला वाटायचे आपला मुलगा ही जबाबादारी घ्यायला फार लहान आहे. पण त्यांच्या बॅंकेत मात्र, आपल्या मुलाने बँक खात्यातून सर्व पैसे काढल्याचे समजताच त्यांना धक्का बसला.शिवाय मुलाने पासबुक हरवल्याचे तिला सांगितले. पैसे काढण्यासाठी त्याने खात्याचा पासवर्ड बदलला. पण लुईस यांना कळले की त्याच्या मुलाने सर्व पैसे त्याच्या प्रेयसी वूला दिले आहेत. या पैशातून त्याने तिच्यासाठी सुमारे 22 लाख रुपये भेट म्हणून एक नवीन कार खरेदी केली आणि फिरायला नेले. एवढेच नाही तर उरलेले 34 लाख त्यांनी परत मागितले त्यावेळी त्याने नकार दिला. तिने त्याच्या नावावर जमा केले त्यामुळे ते आता त्याचे असल्याचे सांगितले. अखेर लुईस यांनी न्यायासाठी मुलाविरोधात कोर्टाचे दरवाजे ठोठावले. सिचुआन मियानयांग फुचेंग पीपल्स कोर्टाने आई आणि मुलामध्ये एक करार केला. त्यानंतर लुईच्या मुलाने त्यांना उर्वरित पैसे परत केले.