Lok sabha 2019 : अजितदादांना पार्थविरोधात ‘मॅचफिक्सिंगची भीती

17
ajit-pawar-in-speech

सामना ऑनलाईन । चिरनेर

कार्यकर्त्यांनो, आपापसातील मतभेद विसरून कामाला लागा, अन्यथा आपल्यावर पश्चात्तापाची वेळ येईल, असे सांगतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पार्थविरोधात ‘मॅचफिक्सिंग’ करू नका, अशी विनवणी त्यांनी केली. अजितदादांच्या भीतीने राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेसच्या मेळाव्यात चिंतेचे ढगच जमू लागले होते.

गेल्या महिनाभरापासून सस्पेन्स ठेवणाऱ्या राष्ट्रवादीने अपेक्षेप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत शेकापने जाहीर पाठिंबा दिला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये धाकधूक कायम आहे. नेमकी हीच  भीती उरणमध्ये झालेल्या मेळाव्यात अजित पवारांनी बोलून दाखवली. ते म्हणाले, कार्यकर्त्यांनो, आपापसातील वाद मिटवले नाहीत तर विरोधकांच्या विजयाचा गुलाल उधळेल आणि हा पराभव आपल्याला परवडणारा नसेल. त्यामुळे ‘मॅचफिक्सिंग’ करू नका, असा इशाराच देत त्यांनी एकप्रकारे कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवला.