Lok sabha 2019 सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत अजित पवारांचा गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बारामती

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे यांनी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केले आहे.

काय आहे विखे आणि पवार यांच्यातील सत्तासंघर्ष? वाचा सविस्तर…
तुम्ही 1991ची पुनरावृत्ती करा, आम्ही 99 ची करू! सुजय विखे यांचा पवारांना इशारा

नगर लोकसभा जागेवरून वाजल्यामुळेच सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु आता याबाबत अजित पवार यांनी वेगळाच गौप्यस्फोट केला आहे. बारामतीमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, सुजय विखे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याची आमची तयारी होती, परंतु स्वत: त्यांनीच उमेदवारी नाकारली. तसेच निवडणुकीमध्ये अंतर्गत गटबाजीचा फटका बसले म्हणून सुजय विखे यांना उमेदवारी नाकारल्याचे अजित पवार म्हणाले.

नगरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही! विखे-पाटील दुखावले
मुलाच्या भाजप प्रवेशाबाबत विखे पाटील देणार हायकमांडला स्पष्टीकरण

अजित पवार म्हणाले की, सुजय विखेंना मी स्वत: आणि जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीकडून लढण्यास सांगितले होते. मात्र, ते स्वत:च नको म्हणाले आणि हे खोटं निघालं तर वाट्टेल ते करायला तयार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं. याआधी नगरची जागा सोडण्यासाठी काँग्रेसनं राष्ट्रवादीकडे अनेकदा तगादा लावला. मात्र, राष्ट्रवादीनं नगरची जागा न सोडल्यानं अखेर सुजय विखेंनी भाजपचा मार्ग धरल्याचा दावा स्वत: सुजय विखेंनी केला होता.

Lok Sabha 2019 सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर प्रचार यंत्रणा लागली कामाला 

याआधी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आजोबांबाबत शरद पवार यांनी वक्तव्य केल्याने नाराज झालेल्या सुजयने भाजपमध्ये प्रवेश केला असे म्हटले होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्याबाबत वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत पवार विखेंचा द्वेष करतात असेही म्हटले होते.

काँग्रेसपुढे अडचणींचा डोंगर; शेट्टींचा ठेंगा, विखेंनी दाखविला इंगा, आता मुस्लिम घेताहेत पंगा