lok sabha 2019 ब्रेकिंग: किरीट सोमय्यांचा पत्ता कट, भाजपची मनोज कोटक यांना उमेदवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
manoj-kotak

सामना ऑनलाईन । मुंबई

ईशान्य मुंबईतून भाजपकडून लोकसभेसाठी यंदा मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना-भाजप युतीचे ते उमेदवार असतील. ईशान्य मुंबईत मनोज कोटक यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्याच कामकाजावर त्यांना लोकसभेचे तिकीट मिळाले आहे. मात्र यामुळे या मतदार संघातील सध्याचे खासदार किरीट सोमय्यांचा पत्ता कापला गेला आहे.

भाजपने आज लोकसभा निवडणुकांसाठीच्या उमेदवारांची 16 वी यादी प्रसिद्ध केली. या यादीत पहिल्याच स्थानावर मनोज कोटक यांचे नाव असून त्यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच या यादीत उत्तर प्रदेशातील पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे.