
सामना ऑनलाईन । इटानगर
हिंदुस्थानी लोकशाहीसाठी एकेक मत मौल्यवान असते. कारण एका मतानेही विरोधक जिंकतात आणि सत्ताधारी पराभूत होतात. त्यामुळेच अरुणाचल प्रदेशमधील हलियान या केवळ एक मतदार असलेल्या मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने एक मतदानकेंद्र उघडले आहे. हलियान हे देशातील सर्वात छोटे मतदान केंद्र ठरले आहे.


























































