उद्धव ठाकरे यांच्या पालघर दौऱ्यास सुरुवात, जंगी स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray-palghar

सामना प्रतिनिधी । पालघर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पालघर जिल्हा दौऱ्यास आज प्रारंभ झाला. वसईच्या बापाणे फाट्यावर उद्धव ठाकरे यांचे फटाक्यांच्या आतषबाजीसह जंगी स्वागत करण्यात आले… कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला… अशा घोषणांनी परिसर दणाणला होता.

पालघर मतदारसंघातील प्रचाराची सुरुवात करताना उद्धव ठाकरे यांनी वसईच्या किल्ल्यास भेट दिली. नरवीर चिमाजी अप्पांच्या पुतळ्याला वंदन केल्यानंतर त्यांनी प्रचार सुरू केला. यावेळी पुणेरी पगडी घालून स्थानिकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी वसईतील प्रसिद्ध गुरूद्वाराचे दर्शन घेतले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बॅसीन कॅथलिक बँकेला देखील सदिच्छा भेट दिली. बँकेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नरवीर चिमाजी अप्पा यांच्या प्रतिकृतीचे सन्मानचिन्ह भेट म्हणून देण्यात आले.