Lok sabha 2019 झारखंडमध्ये भाजप व आजसूमध्ये आघाडी, जागावाटपाचा मुद्दाही निकाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. 2014 चा मोदी फिवर आता कमी झाल्याने सत्ताधारी पक्षाविरोधात विरोधक महाआघाडी स्थापन करत आहे तर सत्ताधारी पक्षही विविध राज्यात स्थानिक पक्षांसोबत आघाडी करत आहे. शुक्रवारी झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षाने ऑल इंडिया झारखंड स्टुडेंट यूनियन (आजसू) सोबत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंडमध्ये भाजपमध्ये 14 पैकी 13 जागांवर लढणार आहे, तर एका जागेवर आजसूचा उमेदवार लढणार आहे. दोन्ही पक्ष पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढवणार आहेत.

झारखंडमध्ये आघाडीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि आजसूचे अध्यक्ष सुदेश महतो यांच्यात दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्येत जागावाटपीचा मुद्दा सोडवण्यात आला. या बैठकीमध्ये झारखंड भाजपचे प्रभारी मंगल पांडे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, थावरचंद गहलोत, जेपी नड्डा, परराष्ट्री मत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान आणि महासचिव भूपेंद्र यादव उपस्थित होते. या बैठकीमध्ये झारखंडमधून भाजप 13 जागांवर तर आजसूचा एकमेव उमेदवार गिरीडीह येथून लढण्याची शक्यता आहे.

याआधी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी

sudesh-mahato महाराष्ट्रात शिवसेनेच्या सर्व मागण्या मान्य करत युतीची घोषणा केली. त्यानंतर तामिळनाडूतही अण्णा द्रमुक आणि पंजाबमध्ये अकाली दलासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता झारखंडमध्ये आजसूसोबत आघाडीचा निर्णय झाला.

विधानसभा एकत्र, लोकसभा वेगळी…
2014 मध्ये भाजप आणि आजसूने आघाडी करत विधानसभा निवडणुका लढल्या होत्या. दोन्ही पक्षांनी एकत्रीतपणे 81 पैकी 42 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर आघाडीचे सरकार स्थापन केले होते. विधानसभा एकत्र लढल्या असल्या तरी दोन्ही पक्षांनी गेल्या वेळी लोकसभा निवडणूक मात्र वेगळी लढली होती. 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपमध्ये झारखंडमध्ये 14 पैकी 12 जागांवर विजय मिळवला होता. आगामी 2019 निवडणुकीमध्येही भाजप-आजसू आघाडी सर्वाधिक जागा जिंकेल असा विश्वास आजसूचे अध्यक्ष सुदेश महतो यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत बोलताना सुदेश महतो म्हणाले की, ‘जागावाटपाचा सर्वाधिक फायदा भाजपला होणार आहे. कारण सध्या संपूर्ण विरोधक भाजपविरोधात आघाडी करत आहेत. अशा स्थितीमध्ये आजसूसोबत एकत्र लढल्याने भाजपसाठी हा फायद्याचा सौदा ठरणार आहे.’

sudesh-mahato