काँग्रेसच्या एक्झिट पोलमध्येही युपीएपेक्षा एनडीएला जास्त जागा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये एनडीएला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसच्या एक्झिट पोलमध्येही युपीएपेक्षा एनडीएला जास्त जागा मिळतील असे दिसून आले आहे. या एक्झिट पोलनुसार, भारतीय जनता पक्षाच्या 200 च्या आत जागा येतील, तर एनडीएला 230 पर्यंत जागा मिळतील. तर काँग्रेस एकट्याच्या बळावर 140 जागा जिंकेल असाही दावा करण्यात आला आहे. तर युपीएला 195 च्या आसपास जागा मिळतील असेही या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आले आहे.

विरोधी पक्षांची व्हीव्हीपॅट पावत्यांच्या मतगणनेची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली
‘EVM’च्या विश्वासार्हतेवर संशय घेणाऱ्या विरोधकांना शहांचे सहा सवाल

‘आज तक‘ने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसला आशा आहे की युपीए तामिळनाडू, केरळ आणि पंजाबमध्ये चांगली कामगिरी करेल. बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्री, गुजरात, झारखंड आणि हरयाणामध्येही काँग्रेसला जास्त जागांशी आशा आहे. काँग्रेसच्या मते युपीए बिहारमध्ये 15, महाराष्ट्रात 22 ते 24, तामिळनाडूमध्ये 34, केरळमध्ये 15, गुजरातमध्ये 7, कर्नटकात 11 ते 13, पश्चिम बंगालमध्ये 2, मध्य प्रदेशात 8 ते 10, हरयाणामध्ये 5 ते 6, राजस्थामध्ये 6 ते 7 जागा जिंकेल.

24 तास महत्त्वाचे, सतर्क राहा; राहुल गांधींचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन

यासह युपीए उत्तर प्रदेशमध्ये 5, दिल्लीमध्ये 2, पंजाबमध्ये 9, छत्तीसगडमध्ये 9, ओडिशामध्ये 2, तेलंगानामध्ये 2, जम्मू-कश्मीरमध्ये 2, हिमाचल प्रदेशमध्ये एक, गोव्यात एक, झारखंडमध्ये 5, उत्तराखंडमध्ये, पूर्वोकडील राज्यांमध्ये 9 ते10, आसाममध्ये 6, अरुणाचल प्रदेशमध्ये एक, मेघालयमध्ये 2 आणि नागालँडमध्ये एक जागा जिंकेल. दक्षिण हिंदुस्थानाकडूनही काँग्रेसला आशा आहे.