
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 5 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. एकूण 8 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. 20 एप्रिलला अर्जाची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सैनिक समाज पक्षाकडून सुरेश गोविंदराव शिंदे, बहुजन समाज पक्षाकडून राजेंद्र आयरे, वंचित बहुजन आघाडीकडून मारुती रामचंद्र जोशी, महायुतीकडून नारायण राणे आणि अपक्ष विनायक लवू राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरले.


























































