एसएबीए कप बॅडमिंटन स्पर्धा; लोकेश, अदिती काळे, अदिती रोडे अंतिम फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकेश जांगीड, अदिती काळे आणि अदिती रोडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून योनेक्स-सनराईज एसबीए कप कॉर्पोरेट बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

शिवाजीनगर येथील पीडीएमबीए मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा सुरू आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत लोकेशने आनंद साबूवर 15-8, 15-9 अशी मात केली. लोकेशची आता विजेतेपदासाठी अथर्व घाणेकरविरुद्ध लढत होईल. अथर्वला दुसऱया उपांत्य फेरीत गुरुप्रसाद राऊतविरुद्ध पुढे चाल मिळाली.

महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत अदिती काळेने प्रिया बोरसेवर 15-3, 15-7 असा विजय मिळवला, तर अदिती रोडेने मनाली देशपांडेला 15-5, 15-8 असे नमविले. अदिती काळेला तिहेरी मुकुटाची संधी आहे. तिने मिश्र दुहेरीत ऋतुराज देशपांडेच्या साथीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अदिती काळे-ऋतुराज देशपांडे जोडीने उपांत्य फेरीत मिहिर रतनजांकर-अदिती रोडे जोडीला 15-4, 15-1 असे नमविले. यानंतर महिला दुहेरीत अदिती काळे-राधिनी भामेरेच्या साथीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिला उपांत्य फेरीत पुढे चाल मिळाली आहे.

निकालः पुरुष एकेरीः उपांत्यपूर्व फेरीः गुरुप्रसाद राऊत वि. वि. आकाश भालेकर 15-8 15-11, अथर्व घाणेकर वि. वि. सुशांत पाटील 115-9 15-11, लोकेश जांगीड वि. वि. हिमांशू मेहरा 15-5 15-6, आनंद साबू वि. वि. विशाल खिरे 15-8 15-7. पुरुष एकेरी ः 30 वर्षांवरील ः उपांत्य फेरी ः ओंकार केळकर वि. वि. शंतनू पाटील 14-16, 17-15, 15-13, सुशांत पाटील वि. वि. विपुल अन्वेकर 15-9 15-11. 35 वर्षांवरील पुरुष ः उपांत्य फेरी ः आनंद साबू वि. वि. अजिंक्य धर्माधिकारी 17-15 15-9, अक्षय गद्रे वि. वि. शंतनू पाटील 15-6 15-3.