
सामना प्रतिनिधी । नगर
लोकसभा निवडणुकीमध्ये सध्या प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. विद्यमान आमदार आजी-माजी आमदार यांचा जसा कस पणाला लागला आहे. त्याच प्रमाणे प्रमुख पक्षाचे जिल्हाध्यक्षांचा कस पणाला लागणार आहे.
संघटात्मक जबाबदारी देताना, सध्या सर्वच पक्ष विषय दखल घेत आले. पक्ष पातळीवर जबाबदारी देताना महत्त्वाची असलेल्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांची पदे महत्त्वाची आहेत. अर्थातच सर्वच पदाधिकारी सुध्दा तेवढेच महत्त्वाचे आहेत. पण पक्षीय पातळीवर जिल्हाध्यक्षाच्या मार्पचत सर्व नियोजन करण्याचे संकेत आहेत.
लोकसभेच्यानिवडणुकीमध्ये सध्या आजी-माजी आमदारासंह पदाधिकारी हे निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. त्यामुळे त्याचा कससुध्दा या निवडणुकीत दिसून येणार आहे. आगामी होणार्या निवडणुका लक्षात घेता. त्यांची ही निवडणुक एक प्रकारे एक रंगीत तालीमच आहे. पण दुसरीकडे भाजपाचे, शिवसेनेचे, काँग्रेसचे, तसेच राष्ट्रवादी आदींसह अन्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष खर्या अर्थाने जोमाने कामाला लागले आहेत.
पक्षीय पातळीवर कोण कोणाचे काम नित्य नियमाने करतो, दिलेली जबाबदारी व्यवस्थीत रित्यापार पाडतो की नाही, गाव पातळीवर कार्यकर्ते योग्य पध्दतीने प्रचारव नियोजन करतात की नाही, या सह अनेक विषय असताना वरिष्ठ पातळीवरुन येणारे आदेश, सभा, प्रचार सभा याचेही नियोजन जिल्हाध्यक्षच्या मार्फत सध्या सुरु आहे. कामांची जबाबदारी इतर पदाधिकार्यांवर देऊन प्रचारात कोणतीही कमतरता राहणार नाही याची खबरदारी घेऊन वरिष्ठांना त्याची बाब निदर्शनात आणून देणे असा दुवा सध्या जिल्हाध्यक्षाचा पहायला मिळत आहे. सध्या जिल्हाध्यक्षांचे प्रचारामधील नियोजन पाहता अन्य पदाधिकार्यांवर जबाबदारी देऊन काम करुन घेण्यात चांगलाच कस लागला आहे.
एकंदरीतच आजी माजी पदाधिकार्यांबरोबरच आता जिल्हाध्यक्षार्च्या आदेशाने प्रचारापासून तर सभापर्यंतचे नियोजन आखले जात असल्याने सध्या सर्वात मोठी बजबादारी ही सर्वच जिल्हाध्यक्षावर पक्षीय पातळीवर येवून ठेपली आहे.
































































