बांगलादेश आणखी एक धक्का देणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। लंडन

न्यूझीलंडने सलामीच्या लढतीत श्रीलंकेला लोळवत वर्ल्ड कपमध्ये दमदार सलामी दिली. आशिया खंडातील बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला अनपेक्षितपणे पराभूत करीत मानाच्या स्पर्धेची सुरुवात शानदार केली. आता बांगलादेश व न्यूझीलंड यांच्यामध्ये बुधवारी लढत होणार असून यावेळी ‘बंगाली टायगर्स’ न्यूझीलंडला हरवून स्पर्धेतील आणखी एक मोठा उलटफेर करण्यासाठी सज्ज झाले असतील. केन विल्यमसनची सेना बांगलादेशला कशी टक्कर देतेय हे पाहणे यावेळी रंजक ठरणार आहे.

न्यूझीलंड व बांगलादेश यांच्यामध्ये होणाऱया लढतीदरम्यान ढगाळ वातावरण काही प्रमाणात असणार आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना काहीशी मदत होईल, पण दिवसभरात फलंदाजांना पोषक असेच वातावरण असणार आहे. तसेच पावसाचीही शक्यता कमी आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना खेळाचा आनंद घेता येणार आहे.