
केवळ खिडकीतून बाहेर बघितले म्हणून चार शिक्षकांनी दहावीच्या विद्यार्थ्याला अक्षरशः फरफटत नेत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना दिल्लीच्या यमुना विहार परिसरातील एका सरकारी शाळेत घडली. हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्या आईच्या तक्रारीवरून दिल्लीतील भजनपुरा पोलीस ठाण्यात चार शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित विद्यार्थ्याला मारहाण केल्यानंतर शिक्षकांनी याबद्दल कुणालाही सांगू नको नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. 15 सप्टेंबर रोजी ही घटना घडली.




























































