
लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखाने नोकर भर्तीत स्थानिकांना प्राधान्य देत नसल्याची तक्रार तिथल्या तरुणांनी केली आहे. इथल्या कारखान्यांमुळे प्रदूषणासह इतर समस्यांना स्थानिकांना तोंड द्यावे लागते. आम्ही हा त्रास सहन करत असू तर आम्हाला इथल्या कारखान्यात नोकऱ्याही प्राधान्याने मिळायला हव्यात असं इथल्या तरुणांचे म्हणणे आहे. स्थानिक तरुणांऐवजी कारखाने परजिल्ह्यातील तरुणांना नोकऱ्या देत असून हा आपल्यावर अन्याय असल्याचं इथल्या तरुणांचे म्हणणे आहे. येथील कारखान्यांमध्ये नोकरी मिळण्यासाठी जी योग्यता असायला हवी स्थानिक तरुणांकडे आहे, असं असतानाही इथल्या नोकऱ्यांच्या जाहिराती परजिल्ह्यातील वर्तमान पत्रांमध्ये दिल्या जातात आणि उमेदवारांच्या मुलाखतीही परजिल्ह्यात जाऊन घेण्यात येतात असा आरोप इथल्या तरुणांनी केला आहे.




























































