
रयत शिक्षण संस्थेच्या माढा येथील महाविद्यालयासाठी दानशूर मंडळींनी दान केलेल्या शेतजमिनीमधून अवैध गौण खनिज व मुरुम यांची अवैधरीत्या वाहतूक करण्यात आली आहे. ठेकेदाराने शैक्षणिक संस्थेला दान केलेल्या शेतजमिनीतील मुरुमावरच डल्ला मारला आहे. या धक्कादायक प्रकारावर महसूल विभाग, पोलीस प्रशासन गांभीर्याने काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरीब तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. या उदात्त कार्यासाठी माढा शहरातील काही दानशूर मंडळींनी संस्थेला भांगे वस्तीजवळील शेतजमीन दान केली आहे. या शेतजमिनीतूनच ठेकेदाराने हजारो ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन केले आहे. या प्रकारामुळे शिक्षणप्रेमी मंडळींकडून संताप व्यक्त होत आहे. प्राचार्यांनी संबंधित ठेकेदाराला परवानगी दिली होती का? दिली असेल, तर या बाबतीत रयत शिक्षण संस्था, सातारा येथील सचिवांची परवानगी घेतली होती का? असे प्रश्न उपस्थित होत आहे.
दुसरीकडे अवैधरीत्या गौण खनिज व मुरुम वाहतूक, वाळूप्रकरणी शासनाने निर्बंध अधिक कडक करीत असतानाच महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराची निरंकुश टोळी कार्यरत आहे. यांचा बंदोबस्त करण्यासाठी महसूल विभाग ठोस पावले कधी उचलणार, असा सवाल उपस्थित होत आहे. माढा शहरातील चोहोबाजूंनी अशा अवैधरीत्या मुरुम वाहतूक होत असताना, शैक्षणिक संस्थेला दान केलेल्या जमिनीवरही ठेकेदाराच्या टोळीने घाला घातला असून, महसूल विभागाचे भरारी पथक नेमके काय करते, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.धुमाळ यांची साक्ष व आरोपीचा कबुलीजबाब ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली आहे.
या खटल्यासाठी पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे व सहायक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक शेडगे यांनी कामकाज पाहिले.

























































