
राज्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासांत राज्यात 17 हजार 66 नवे कोरोनाबाधित आढळले असून 257 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. 15 हजार 789 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सोमवारी रुग्णालयांमधून डिस्चार्जदेखील देण्यात आला आहे. राज्यात सध्या 2 लाख 19 हजार 256 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यातील 10 लाख 77 हजार 374 कोरोनाबाधितांच्या संख्येत 2 लाख 91 हजार 256 ऑक्टिव्ह रुग्ण व आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 7 लाख 55 हजार 850 जणांचा समावेश आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 70.16 टक्के आहे. आजपर्यंत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या 53 लाख 21 हजार 116 नमुन्यांपैकी आजपर्यंत 10 लाख 77 हजार 374 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सद्यस्थितीत राज्यात 17 लाख 12 हजार 160 जण होम क्वारंटाइन आहेत.
मुंबईत दिवसभरात 2,256 कोरोना रुग्ण
1,431 कोरोनामुक्त, 31 जणांचा मृत्यूमुंबई, दि. 14 (प्रतिनिधी) – मुंबईत सोमवारी दिवसभरात 2,256 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत 1,431 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 1 लाख 32,349 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 31 जणांचा मृत्यू झाला.
मुंबईत 31 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 8 हजार 178 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 56 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 31 हजार 63 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 9 लाख 25 हजार 148 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1,71,949 वर पोहोचली आहे.




























































