कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढला, राज्यात चोवीस तासांत 216 दगावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी कोरोनामुळे मृत्यू होणाऱयांच्या संख्येत आज वाढ दिसून आली. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीप्रमाणे आज राज्यात 216 रुग्णांचा मृत्यू झाला. मंगळवारी कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 119 होता. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या मात्र कालच्या तुलनेत आज जास्त आहे. 4 हजार 380 रुग्ण कोरोनातून बरे झाले.

राज्यात आज 5 हजार 31 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले. मंगळवारी 4 हजार 355 नवे रुग्ण सापडले होते. राज्यातील कोरोना मृत्यूदरात पिंचित वाढ होऊन तो 2.12 टक्क्यांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आतापर्यंत 97.04 टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत राज्यात 62 लाख 47 हजार 414 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण

राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांचा आकडा 50 हजार 183 झाला आहे. सर्वाधिक 12 हजार 673 सक्रीय कोरोना रुग्ण पुणे जिह्यात आहेत. ठाणे जिल्हा दुसऱया क्रमांकावर आहे. ठाण्यात 7 हजार 41 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर सातारा (5 हजार 400), सांगली (4 हजार 668), नगर (4 हजार 716) आणि सोलापूर (3 हजार 979) या जिह्यांचा क्रमांक लागतो.

सक्रीय रुग्णांची संख्या
मुंबई 3 हजार 112
रत्नागिरी 956
सिंधुदुर्ग 1 हजार 57
बीड 894
नाशिक 885
रायगड 598
संभाजीनगर 629
नांदेड 34
जळगाव 41
नागपूर 97
यवतमाळ 6
धुळे 17
भंडारा 6
गोंदिया 4
नंदूरबार 1