अनिल देशमुख यांचे माजी स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचे माजी स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना आज सीबीआय न्यायालयाने जामीन मंजूर केला. कुंदन शिंदे हे गेल्या एक वर्ष सात महिन्यांपासून आर्थर रोड तुंरुंगात होते. अखेर आज  त्यांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका करण्यात आली. कुंदन शिंदे हे अनिल देशमुख यांच्यासोबत मनी लाँडरींग प्रकरणात सह आरोपी आहेत.

दोन दिवसांपूर्वी कुंदन शिंदे यांनी सत्र न्यायालयाने एक लाखाचा जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआय प्रकरणात त्यांना जामीन नव्हता मिळाला. अखेर आज त्यांना सीबीआयच्या न्यायालयानेही जामीन मंजूर केला. त्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली.