
नागपुरात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. या स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या वारसांना सरकारने 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे, असे ट्विट फडणवीस यांनी केले.
Breaking – नागपुरात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये भीषण स्फोट, 9 जणांचा मृत्यू; अनेक जखमी
संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः IG, SP, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्र्यांनीही मान्यता दिली आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे.
संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 17, 2023


























































