महाराष्ट्रात आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी कसा काढाल E-Pass? वाचा सविस्तर

महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट थैमान घालत आहे. त्या लाटेला रोखण्यासाठी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवासाला मनाई करण्यात आली आहे.

जर तुम्हाला काही अत्यावश्यक कारणांसाठी आंतरजिल्हा प्रवास करायचा झाला तर त्यासाठी ई-पास काढणं बंधनकारक आहे. त्या ई-पासच्या साहाय्यानेच तुम्ही आंतरजिल्हा प्रवास करू शकता. पण, हा ईपास काढायचा कसा, याबाबत अनेकांना काही प्रश्न आहेत. हा ई-पास कसा काढायचा याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

अशी आहे प्रक्रिया –

हा ई-पास काढण्यासाठी सर्वप्रथम https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जा.
त्या संकेतस्थळावर ‘apply for pass here’ असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
तिथे विचारली जाणारी आवश्यक कागदपत्र जोडा. प्रवास करण्यासाठीचं अत्यावश्यक कारण नमूद करा.
त्यानंतर तिथे फोटो या पर्यायावर 200 KB साईजपेक्षा कमी इमेज अपलोड करा.
त्यानंतर सबमिटवर क्लिक करून तुमचा अर्ज दाखल करा.
अर्ज केल्यानंतर सदर संकेतस्थळावर तुम्हाला एक टोकन आयडी मिळेल. तो आयडी सेव्ह करून ठेवा. कारण, तुमच्या अर्जाची प्रक्रिया कुठपर्यंत आली, ते त्या आयडीवरून तुम्हाला कळू शकेल.
कागदपत्रांची पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्हाला मिळालेला टोकन आयडी वापरून ई-पास डाऊनलोड करा.
या पासवर तुमची माहिती, वाहन क्रमांक, पासची वैधता तसंच क्युआर कोड नमूद असेल.
दरवेळी आंतरजिल्हा प्रवास करताना पासची मूळ प्रत आणि संगणकीय प्रत (सॉफ्ट कॉपी) सोबत ठेवा.

आपली प्रतिक्रिया द्या