
नगर जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काही कालावधीमध्ये जातीय दंगली उफाळून येण्यास सुरुवात झाली आहे. वेळीच याचीपाळेमुळे शोधून काढली नाही तर भविष्यात पोलीस प्रशासनासमोर या दंगलीचे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता तरी घडलेल्या घटनेनंतर पोलीस प्रशासन ठोस पावले उचलणार का? हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगर शहरामध्ये वर्षभरात लहानसहान अशा 14 घटना या वेगवेगळ्या माध्यमातून घडलेल्या आहेत. नगर शहरांमध्ये सलग चार घटना तर एकाच महिन्यात घडलेल्या आहेत. या घटना ताज्या असतानाच आता याचे लोन ग्रामीण भागामध्ये म्हणजे तालुकास्तरावर आता वाढू लागलेले आहे. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होऊन त्याला दंगलीच स्वरूप आणले जात आहे. वास्तविक पाहता पोलीस प्रशासनाकडे विशेष अशी यंत्रणा आहे तसेच वेगवेगळे अधिकारी सुद्धा प्रत्येक वेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आल्यानंतर नेमले जातात. तत्पूर्वी महत्त्वाचे असे ज्याला आपण प्लेन क्लोथ म्हणतो असे पोलीस सुद्धा प्रत्येक ठिकाणी नियुक्त केलेले असतात. आज खऱ्या अर्थाने ते नियुक्त आहेत का हा खरा प्रश्न आहे ? प्रत्येक वेळेला चाललेल्या घडामोडींवर देखरेख ठेवून अधिकाधिक माहिती गोळा करण्याचं काम ते करतात पण अलीकडच्या काळामध्ये पोलीस यंत्रणेमध्ये झालेला बदल लक्षात घेतल्यानंतर त्याचा मोठा फटका सुद्धा आता एक प्रकारे बसू लागलेला आहे .
अनेक सण उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र साजरे केले जातात गावाची परंपरा किंवा शहरांमध्ये असलेली परंपरा ही कायम ठेवून सर्वजण गुण्यागोविंदाने सण, उत्सव साजरे करतात. हे परंपरेतून चालत आहे, आज अनेक वर्षापासून असे उत्सव साजरे होतात मात्र अगोदर कधी अशा प्रकारचा उद्रेक झाला असे नाही, पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये अनेक ठिकाणी सोशल मीडियाचा वापर हा अतिरेक होऊ लागला असून त्यातूनच अनेक घटना आता पुढे येऊ लागलेल्या आहेत. हे सुद्धा आज अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे पण दुसरीकडे यावर पोलीस यंत्रणांचा सुद्धा वॉच कायम असतो, असे सुद्धा बोलले जात आहे.
वास्तविक पाहता नगर जिल्ह्यामध्ये सलग चाललेल्या घटना पाहता भविष्यामध्ये याचा उद्रेक मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलीस यंत्रणांनी आता तरी खडबडून जागे होऊन ज्या ज्या घटना झालेल्या आहेत त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याची गरज आता निर्माण झाली आहे. कायद्यासमोर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच पण दुसरीकडे अनेक ठिकाणी निवेदन देऊन काहींनी विनाकारण ज्यांना या प्रकरणांमध्ये अटकवले गेले आहे अशांची मुक्तता करावी अशी मागणी सुद्धा आता होऊ लागलेली आहे, त्यामुळे ही सुद्धा गोष्ट अतिशय महत्त्वाची असून जेणेकरून एखाद्यावर अन्याय होणार नाही हे सुद्धा पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे पण दुसरीकडे अशांतता एक प्रकारे वाढत चाललेली आहे हे सुद्धा तितकेच खरे आहे, म्हणून गावोगावांमध्ये असलेले पोलीस पाटील, गावागावात सुरू असलेले एकोप्याचे कार्यक्रम तर दुसरीकडे जातीय सलोखा, गावात असलेल्या शांतता कमिटीच्या सदस्य या सगळ्या बाबी लक्षात घेतल्यानंतर व नेमके यांचे महत्त्व काय व कसे हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे. घटना घडल्यानंतर शांतता राखण्याच्या आव्हान सर्वच पातळीवर केले जाते, याबद्दल दुमत नाही पण घटनाच घडून येण्याकरता ज्या पद्धतीने उपाययोजना करायला पाहिजेल किंवा तशी यंत्रणा सक्षम व्हायला पाहिजे तशी काही होताना दिसत नाही. अलीकडच्या काळामध्ये नगर जिल्ह्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या घटना या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे याच्या पाठीमागे नेमके कोण आहे, भविष्यामध्ये अशा घटनांना आळा कशा पद्धतीने घालता येईल या दृष्टिकोनातून पोलिसांनीच कटर पाऊल उचलणे गरजेचे आहे. नाहीतर पुन्हा कायदा स्वच्छता प्रश्न निर्माण होऊन उद्रेक होण्याची दाट शक्यता असल्याचेही बोलले जात आहे. एकीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असताना दुसरीकडे आता अशा प्रकारच्या मिरवणुकांच्या माध्यमातून जर उद्रेक होणार असेल तर मग नेमकी आगामी काळात कशी भूमिका घ्यावी लागेल व पुन्हा असे प्रकार घडणार नाही हे सुद्धा पहावे लागेल, म्हणूनच त्याकरता पोलिसांनीच आता कठोर पावले उचलण्याची गरज आहे, पण दुसरीकडे असे प्रकार का घडले कसे घडले व का घडत चालले याची सुद्धा शहानिशा करण्यात तेवढेच महत्त्वाचे आहे.


























































