
आमदार अपात्रता प्रकरणी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव पडू शकत नाही आणि पडणारही नाही, असे राहुल नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
संविधानातील तरतुदींचे पालन करूनच अपात्रतेची कारवाई करण्यात येईल तसेच महाराष्ट्र अपात्रता अधिनियम 1986 च्या नियमांचे तंतोतंत पालन करूनच मी आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय घेणार आहे, असे त्यांनी सांगितले. ज्या लोकांना नियम समजत नाहीत, ज्यांना संविधानातील तरतुदींची माहिती नाही, त्यांनी केलेल्या आरोपांकडे मी लक्ष देत नाही. तसेच, विधानसभेच्या बाहेर केलेल्या आरोपांकडे लक्ष देऊन मी प्रभावित होणार नाही, असेही नार्वेकर म्हणाले. अपात्रता निकालाच्या वेळापत्रकावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने घेतलेल्या आक्षेपाबद्दल नार्वेकर यांना प्रसारमाध्यमांनी विचारले होते.
























































