
सांगली जिह्यातील एसटी कामगारांच्या ‘एसटी कामगार सहकारी सोसायटी’ या पतसंस्थेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने भगवा फडकवला आहे. संचालक मंडळ निवडणुकीत विकास पॅनलचे नामदेव रेवे यांची अध्यक्ष, तर अश्विनी धुमाळ यांची उपाध्यक्षपदी आठ विरुद्ध तीन मतांनी निवड करण्यात आली.
शिवसेना नेते, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत यांच्या आदेशावरून सांगली एसटी कामगार सहकारी सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. सोसायटीवर 61 वर्षांपासून मान्यताप्राप्त कामगार संघटनेची एकहाती सत्ता होती. या प्रदीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच सत्तांतर झाले. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या विकास पॅनलमधून निवडलेल्या संचालकांमधून संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत विकास पॅनलचे संचालक अजित भोसले, विशाल पवार मच्छिंद्र बंडगर, सुरेंद्र सूर्यवंशी या संचालकांनी भाग घेतला.
आदित्य ठाकरेंकडून संचालकांचे अभिनंदन
संचालकांनी गुढीपाडव्याचे औचित्य साधून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी संचालकांचा सत्कार केला. एसटी कामगार सेनेच्या माध्यमातून कामगार हित आणि संस्था विकासासाठी काम करण्याचे आदेश आदित्य ठाकरे व अरविंद सावंत यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर, उपाध्यक्ष प्रकाश हंकारे, कोषाध्यक्ष राजेंद्र मोजाड, महेश शेळके, महेश पाटील, विलास यादव, प्रकाश हंकारे, रमेश ऊर्फ बंडा गवळी, काका पाटील, सुरेश माने, पितांबर मंडले, युवराज शिंदे, कुणाल शिंदे, इमरान आमीन, प्रकाश कदम, तुकाराम जाधव, हमीद मुल्ला, संतोष सावंत, शेळके अब्दुल दिवाण, संदीप घाडगे, प्रशांत चोपडे उपस्थित होते.






























































