महाराष्ट्र विद्यालयात अत्याधुनिक कलागृह आणि डिजिटल वर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगावच्या नूतन विद्यामंदिर संस्थेच्या महाराष्ट्र विद्यालय खासदार निधीतून साकारलेल्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा दिमाखात पार पडले. यात अत्याधुनिक कलागृह, कॉम्प्युटर लॅब, डिजिटल वर्गखोल्या व सीसीटीव्ही सुरक्षा कक्षाचे उद्घाटन करण्यात आला. दरम्यान, विद्यालयाच्या प्राथमिक व माध्यमिक मराठी माध्यमाच्या शैक्षणिक वर्ष विद्यार्थी दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले आहेत.

शिवसेना माजी राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. वेदान्त फाउंडेशन, रोटरी क्लबच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना सीसीटीव्ही, मोबाईल रिपेअरिंग, ब्युटी, आयटी आदी रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार आहे. या उद्घाटन सोहळ्यादरम्यान नगरसेविका लक्ष्मी भाटिया-फाळके, रोटरी क्लबच्या अध्यक्षा गौरी सावंत, सचिव दर्शन शाह, उपाध्यक्ष सखाराम गिराप, रवी सैनी, रोटेरियन अनिल सिंघी, राजेश अग्रवाल, वेदांत फाउंडेशनचे रझवान नाईक आदी मान्यवरांसह अमित जोशी, अजित पितळे, सुजित कदम, संस्थेचे अध्यक्ष संदीप सावंत, संस्थेचे सचिव अनिल देसाई, संचालक शंकर पटनाईक, संजय काळभोर, महेश करमरकर, प्रतिभा तरपटला, मुरलीधर मोरे, प्रा. पूर्वा नाईक, विष्णू मसुरकर, पदाधिकारी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते.