राज्यात 18 हजार 56 नवीन रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात दिवसभरात 13 हजार 565 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत तर 18 हजार 56 नवीन रुग्णांचे निदान झाले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 30 हजार 015 कर पोहोचली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.91 टक्के एवढे झाले आहे. सध्या 2 लाख 73 हजार 228 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात 380 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची रविवारी नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.66 टक्के एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 65 लाख 65 हजार 649 नमुन्यांपैकी 13 लाख 39 हजार 232 नमुने पॉझिटिव्ह (20.40 टक्के) आले आहेत. राज्यात 19 लाख 64 हजार 644 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 30 हजार 467 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात 2261 कोरोना रुग्ण

मुंबईत रविवारी दिवसभरात 2261 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत एकूण 4190 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 1 लाख 62,939 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 44 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 44 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 8 हजार 791 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 66 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 26 हजार 593 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 10 लाख 82 हजार 329 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 98,720 वर पोहोचली आहे.