
देशासह राज्यात दिवाळीनिमित्त उत्साहाचे वातावरण असताना अंबाजोगाईमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. महावितरणचा लाईनमन काम करत असताना अचानक वीज पुरवठा सुरु झाला आणि तो कर्मचारी विद्युत तारेला खांबावरच चिटकला. या दुर्देवी घटनेत कर्मचारी मेघराज चाटे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अंबाजोगाई शहरामध्ये घडली आहे.
अंबाजोगाई शहरातील सदर बाजार तलावाशेजारी असलेल्या महावितरणच्या दवाखाना एक्सप्रेस फिडरवर तांत्रिक अडचण आल्याने लाईनमन मेघराज व्यंकटी चाटे (रा.वरवटी) हे तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यासाठी विद्युत खांबावर चढले. काम सुरू असताना विद्युत पुरवठा अचानक सुरू झाल्याने शॉक बसून चाटे हे खांबाला चिटकले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने अंबाजोगाईमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
























































