माजलगाव शहरात अर्धवट जळालेले प्रेत आढळले, घातपाताचा संशय

16979

माजलगाव शहरातील अशोकनगर भागात नाल्याच्या कडेला अर्धवट जळालेला मानवी सांगडा सोमवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या मागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

माजलगाव शहरात अशोकनगर भागातील खालच्या भागात आसलेल्या नाल्याच्या कडेला अर्धवट आवस्थेत जळालेला मानवी सांगाडा आढळुन आल्याने खळबळ माजली आहे. हा सांगाडा जवळपास 15 ते 16 वर्ष वयाच्या व्यक्तीचा असल्याचा अंदाज आहे. सदरील घटना सोमवारी उघडकीस आली. दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीकांत ढीसले यांनी पोलीस निरीक्षक सुलेमान यांचेसह घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या