
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
गेल्या सहा वर्षात ग्रामीण भागात तीन कोटींहून अधिक शेतमजूरांनी रोजगार गमावला आहे. नॅशनल सॅम्पल ऑफ सर्वे ऑफिसने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
सर्वेक्षणानुसार गेल्या सहा वर्षात 3.2 कोटी अनियमित मजदूर बेरोजगार झाले आहेत. तसेच कृषी व अकृषी क्षेत्रात 7.3 टक्के पुरुष तर 3.3 टक्के महिलांनी आपला रोजगार गमावला आहे.
या सर्वेक्षणाच्या अहवालात आगामी काळात स्वयंरोजगारात 4 टक्क्यांनी वाढ होईल असा अंदाजही व्यक्त केला आहे. सर्वेक्षणानुसार गेल्या सहा वर्षात पुरुष कार्यबल 30.4 कोटींवरून 28.6 कोटी झाला आहे. तसेच देशाचा राष्ट्रीय कार्यबल 4.7 कोटींनी घटला आहे.
नॅशनल सॅम्पल ऑफ सर्वे ऑफिसने मंजूरी दिल्यानंतरही केंद्र सरकारहे हा अहवला जाहीर केलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारहे हा अहवाल जाहीर करण्यासचाल ढकल केली, त्यावरून जानेवारीत आयोगाच्या दोन सदस्यांनी राजीनामाही दिला आहे.


























































