मल्लिकार्जुन खरगेंना कोर्टाचे समन्स; बजरंग दल बंदी प्रकरणी मानहानीचा खटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकमधील बजरंग दलाच्या विरोधात बंदीची कारवाई करण्याच्या पक्षाच्या निवडणुकीतील आश्वासनाप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांच्या मानहानीच्या खटल्यात पंजाब न्यायालयाने त्यांना समन्स बजावले आहे.

संगरूर जिल्हा न्यायालयाने खरगे यांना या खटल्याच्या संदर्भात 10 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. हिंदू सुरक्षा परिषदेचे संस्थापक हितेश भारद्वाज यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता.

नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, काँग्रेसने या महिन्याच्या सुरुवातीला आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि बजरंग दल यासारख्या संघटनांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्याच्या वचननाम्यात देण्यआत आले होते.

यानंतर याचिकाकर्त्याने काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला.

10 मे रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 224 पैकी 135 जागांवर जोरदार विजय मिळवला. भाजप 66 जागांवर घसरला तर JD(S) ने अवघ्या 19 जागा जिंकल्या.