एका रात्रीत दोनवेळा सेक्सला नकार दिल्याने बायकोला ठार मारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातल्या बरेलीमध्ये एक खून झाला आहे. एका नवऱ्याने त्याच्या बायकोचा गळा आवळून तिची हत्या केली आहे. बायकोने एका रात्रीत दोनवेळा सेक्सला नकार दिल्याने नवऱ्याने तिची हत्या केल्याचे कळाले आहे.

पोलिसांना दिलेल्या व्हिडीओ जबाबामध्ये मोहम्मद अन्वर नावाच्या आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने पोलिसांना सांगितलं की, सोमवारी रात्री उत्तेजित झाल्याने त्याने बायकोला उठवलं होतं. दोघांमध्ये शरीर संबंध झाल्यानंतर काही मिनिटांतच अन्वरने बायकोकडे पुन्हा सेक्सची मागणी केली होती. याला बायकोने नकार दिला होता. नकार जिव्हारी लागल्याने संतापाच्या भरात अन्वरने त्याच्या बायकोचा गळा आवळला आणि तिचा खून केला. यानंतर त्याने तिचा मृतदेह प्लॅस्टीकच्या गोणीत गुंडाळून 50 किलोमीटर दून नेऊन फेकून दिला होता. त्याच दिवशी त्याने पोलिसांत बायको बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.

पोलिसांना मंगळवारी ठाकूरद्वारा भागातील रातुपुरा परिसरात एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून प्रकरणाचा तपास सुरु केला होता. पोलिसांनी मृतदेहाचे फोटो आणि बाकीचा तपशील इतर पोलीस ठाण्यांसोबत शेअर केला होता. या महिलेचा तपशील अमरोहा पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीतील बेपत्ता महिलेच्या वर्णनाशी जुळत होता. यामुळे अमरोहा पोलिसांनी अन्वरला त्या महिलेचा मृतदेह हा त्याच्या बायकोचाच आहे का हे जाणून घेण्यासाठी बोलावून घेतले होते. चौकशीदरम्यान अन्वर घाबरला आणि त्याने सत्य पोलिसांना सांगून टाकलं. अन्वर आणि त्याची बायको रुख्सार यांचं 2013 साली लग्न झालं होतं. त्यांना 3 मुलं असू अन्वर हा बेकरी चालवतो.