ठाण्यात प्रेम प्रकरणातून महिलेला ‘ऑनड्युटी’ भोसकले; हल्लेखोराला बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, ठाणे

प्रेम प्रकरणानंतर लग्नाच्या आणाभाका घेऊनही ऐनवेळेस दगाफटका केला म्हणून संतप्त प्रियकराने सहकारी सुरक्षारक्षक महिलेला ‘ऑनड्युटी’ चाकूने भोसकल्याचा धक्कादायक प्रकार आज खोपट येथील नर्सिंग हॉस्टेलमध्ये घडला. बबिता दुबे (40) असे या महिलेचे नाव असून ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी हल्लेखोर सुरक्षारक्षक विकास धनावडे याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

कल्याणला राहणारी बबिता दुबे व विकास धनाकडे यांची तीन ते चार वर्षांपासून मैत्री होती. मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. दोघेही खोपट येथील पालिकेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था आणि वैद्यकीय विद्यार्थिनी वसतिगृहात कामाला होते. बबिता महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडून तर विकास हा खासगी एजन्सीचा सुरक्षारक्षक म्हणून रुजू झाला होता, मात्र विकासला महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या सेवेत दाखल करण्याचे आमिष दाखवून बबिताने त्याच्याकडून 50 ते 60 हजार उकळले, तर लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे प्रेमाचे नाटक केले. आठवडाभरापासून बबिता विकासला टाळत असल्याने त्याच्या संतापाचा कडेलोट झाला.

सायंकाळी वसतिगृहाच्या आकारातच विकासने बबिताच्या गळ्यावर चाकूने वार केले. तिच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.

…म्हणून उचलले टोकाचे पाऊल
बबिता 19 वर्षीय मुलासोबत राहत असून तिचा नवरा नाशिकला राहतो. ठाणे येथील लोकमान्यनगरमध्ये राहणाऱया आरोपी विकासने त्याच्या घरी बबिता व त्याच्या लग्नाबाबत सांगितले होते, मात्र ऐन लग्नाच्या वेळी तिने दगा दिल्याने विकासने असे टोकाचे पाऊल उचलले. तिने विकासकडून घेतलेले 50 हजार रुपयेही त्याने परत मागितले होते. मात्र हे पैसेदेखील परत न मिळाल्याने त्याने हा निर्णय घेतल्याचे पोलीस चौकशीत समोर आले.

summary- man stabbed his girl friend in thane