
चार वर्षांच्या बालकावर अत्याचार करणारा जमावाच्या मारहाणीत ठार झाला. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. राजेंद्र नायर , अझर शाब्बीत शेख, सिपंदर मेहमुद शहा व सोमनाथ गायकवाड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राजेश सोनार ऊर्फ सोनार बाबा असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
सोनार बाबा याने सोमवारी चार वर्षांच्या बालकावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. मुलगा लवकर घरी न आल्याने आईने त्याचा शोध घेतला असता, तो सोनार बाबाच्या घरात आढळला. घडलेल्या प्रकारानंतर फिर्यादी महिलेने आरडाओरडा केल्याने नागरिक जमा झाले. त्यांनी सोनार बाबाला मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
























































