प्राणघातक शस्त्रे घेऊन तरूण ममता बॅनर्जींच्या सरकारी निवासस्थानात घुसला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पुन्हा एकदा सुरक्षाव्यवस्था भेदल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. हा तरुण चाकू आणि इतर प्राणघातक शस्त्रे घेऊन ममता यांच्या सरकारी निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न करत होता. नूर आलम असं या तरुणाचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या तरुणाकडे विविध तपास यंत्रणांची ओळखपत्रेही सापडली आहेत. तसेच आरोपीच्या कारवर ‘पोलीस’ असा स्टीकर लावलेला होता. याच कारने आरोपी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत आला होता.