चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, शीर केले धडावेगळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पती-पत्नींमध्ये होणारे वाद जेव्हा टोकाच्या दिशेने जातात तेव्हा त्याचे परिणाम वाईट होतात. अशा अनेक घटना जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या आहेत. अशाच एका भयंकर घटनेत एक पती त्याच्या पत्नीचे छिन्नविछिन्न शीर हातात घेऊन फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार लखनऊमध्ये घडला आहे.

सदर घटना उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊमध्ये घडली आहे. बाराबांकी येथे वास्तव्याला असणाऱ्या अनिलचे त्याच्या पत्नीशी आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले असून अनिल हा पोटापाण्यासाठी गवंडी काम करत होता. काही कारणांमुळे अनिल आणि त्याची पत्नी विभक्त राहत होते. पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय अनिलला होता. याच रागातून त्याने पत्नीचा शिरच्छेद केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिरच्छेद केल्यानंतर तो पत्नीचे शीर घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरत होता. त्याच्या एका हातात चाकू आणि एका हातात शिर होते. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी अनिलला अटक केली आहे.