
संत श्री बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत युवकाची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले मनोहर उर्फ मामा भोसले (वय 39, रा. उंदरगाव) याला 16 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
शुक्रवारी (दि.10) सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सालपे येथील एका फार्महाऊसवरून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मनोहर भोसले याला ताब्यात घेतले होते. याप्रकरणी भोसले यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शशिकांत खरात (वय 23) यांनी फिर्याद दिली आहे.
खरात याच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामांचा अवतार असल्याचा बनाव करत त्यांच्या वडिलांचा कर्करोग बरा करतो असे सांगितले. त्यानंतर त्यांना बाभळीचा हजर केले असता, भोसले याच्या दोन साथीदारांचा शोध घेण्यासाठी, गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करण्यासाठी, त्याने अशा प्रकारे आणखी गुन्हे केले आहेत का? याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस हजर केले असता, भोसले याच्या दोन साथीदारांचा शोध घेण्यासाठी, गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करण्यासाठी, त्याने अशा प्रकारे आणखी गुन्हे केले आहेत का? याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील अॅड. किरण सोनवणे यांनी केली.
दरम्यान, गुरवारी (दि. 9) मनोहर भोसले विरोधात करमाळ्यात महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मनोहर भोसले याच्याविरोधात तक्रारी देण्यासाठी नागरिक पुढे येऊ लागले आहेत. नागरिकांनी निर्भयपणे पुढे येत तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी केले आहे.





























































