आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज आक्रमक, पंढरपुरात बस फोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

आरक्षण मिळण्यासाठी विलंब होत असल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापूजेपासून रोखण्याचा इशारा दिल्यानंतर या आंदोलनाची तीव्रता वाढविण्याच्या दृष्टीने मराठा समाजाच्या तरुणांनी पंढरपूर येथे एस.टी. बस फोडली आहे.

pandharpur002

मुख्यमंत्र्याना पंढरपुरात आषाढी एकादशीला श्री. विठ्ठलाची महापूजा करू न देण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. यातच बुधवारी पंढरपूर-सांगोला रस्त्यावर पंढरपूरमधून तपकीर शेटफळला जाणाली मुक्कामी एस.टी. बस क्रमांक एम एच १२ ईएफ ६५१० ही महावितरण कार्यालयाजवळ आली असताना दबा धरून बसलेल्या पाच ते सहा तरुणांनी एसटीवर दगडफेक केली. यात बसच्या काचा फुटल्या असून बसमधील चारजण जखमी झाले आहेत.

घटनास्थळावर तरुणांनी ‘ये तो सिर्फ झाकी है मुख्यमंत्री की पूजा बाकी है,पूजा होऊ देणार नाही’ अशी पत्रके टाकलेली आढळून आली आहेत.