बलात्कार केलेल्या तरुणीसोबत लग्न, पण लग्नानंतर मिळाली शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मोगा

पंजाबच्या मोगामध्ये बलात्कार, प्रेम, विवाह, आणि तुरूगंवास अशी एक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यामुळे पीडित तरुणीच्या वडिलांनी त्या मुलाविरूद्ध गुन्हा नोंदवला आणि त्याला अटकही झाली. अजब बाब म्हणजे नंतर त्या दोघांचं प्रेम होऊन लग्न झालं, त्यांना मुलगाही झाला. पण न्यायलयात खटला सुरूच राहिला आणि त्याला पुन्हा शिक्षा झाली.

२०१३ मध्ये पोलिसांनी आरोपी तरुण पलविंदर आणि त्याची आई जसविंदर कौरवर एका साडे सात वर्षाच्या मुलीला फुस लावून पळवण्याच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली होती. अल्पवयीन तरुणीची मेडिकल टेस्ट केली. तरुणीचा जबाब घेतला आणि आरोपीच्या विरूद्ध बलात्काराचा कलम लावून त्याला तरूंगवासात पाठवले.

आरोपी २०१५ मध्ये जामीनावर तरूगांतून बाहेर आल्यानंतर त्या दोघांचं प्रेम जडलं. त्यानंतर ४ जुलै २०१७ मध्ये त्यांनी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगा देखील झाला. मात्र न्यायालयात खटला सुरूच होता. घटनेवेळी ती मुलगी अल्पवयीन होती त्याचा आधार घेत खटला सुरू राहिला. त्या मुलीने मुलाच्या बाजूने जबाब दिला परंतू न्यायालयाने तिचा जबाबा ग्राह्य न धरता त्याला दंडासोबत सात वर्षांची शिक्षा सुनावली.

बुधवारी ११ जुलै २०१८ रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी त्या मुलाला अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याच्या आरोपाखाली सात वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला. तसेच या प्रकरणात दोषी ठरलेल्या आरोपीच्या आईला कोर्टाने सोडून दिले.