
कोरोना विषाणूच्या फैलावानंतर बाजारात मास्क आणि सॅनिटायझरच्या किमतीत भरमसाट वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर मास्क 8 ते 10 रुपयांना, तर सॅनिटायझर 100 रुपयांना अशा किमती केंद्र सरकारने निश्चित केल्या आहेत.
कोरोना वायरस #COVID19 के फैलने के बाद से बाजार में विभिन्न फेस मास्क, इसके निर्माण में लगने वाली सामग्री और हैंड सेनिटाइजर की कीमतों में बेतहाशा वृद्धि देखी गई है। सरकार ने इसे गंभीरता से लेते हुए इनकी कीमतें तय कर दी हैं। 1/3 @drharshvardhan @narendramodi #IndiaFightsCorona
— Ram Vilas Paswan (@irvpaswan) March 20, 2020
मास्क व सॅनिटायझर या जीवनावश्यक वस्तू असल्याचे सरकारने जाहीर केले असून, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी त्यांच्या किमतीही ट्विट करून जाहीर केल्या आहेत. यामुळे काळाबाजार रोखून सर्वसामान्यांना मास्क व सॅनिटायझर रास्त दरात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
आवश्यक वस्तु अधिनियम के तहत 2 और 3 प्लाई मास्क में इस्तेमाल होने वाले फैब्रिक की कीमत वही रहेगी जो 12 फरवरी 2020 को थी, 2 प्लाई मास्क की खुदरा कीमत 8 रु./मास्क और 3 प्लाई की कीमत 10 रु./मास्क से अधिक नहीं होगी। 2/3 @drharshvardhan @narendramodi #IndiaFightsCorona
— Ram Vilas Paswan (@irvpaswan) March 20, 2020
दोन आणि तीन प्लायच्या मास्कमध्ये वापरल्या जाणाऱया फॅब्रिकची किंमत 12 फेब्रुवारी 2020 रोजीच्या दराप्रमाणे असेल. तीन प्लाय मास्कची किंमत 8 रुपये आणि 10 रुपयांपेक्षा अधिक नसेल तर हॅण्ड सॅनिटायझरची 200 मिलीच्या बाटलीची किंमत 100 रुपयांहून अधिक नसेल, असे रामविलास पासवान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हैंड सेनिटाइजर की 200 ML बोतल की खुदरा कीमत 100 रु. से अधिक नहीं होगी। अन्य आकार की बोतलों की कीमत भी इसी अनुपात में रहेंगी। ये कीमतें 30 जून 2020 तक पूरे देश में लागू रहेंगी। 3/3@drharshvardhan@narendramodi #IndiaFightsCorona
— Ram Vilas Paswan (@irvpaswan) March 20, 2020




























































