#Corona माता वैष्णौ देवीची यात्रा स्थगित, गंगा आरतीही अनिश्चित काळासाठी रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लाखो हिंदुचे श्रद्धास्थान असलेल्या जम्मू कश्मीरमधील माता वैष्णौ देवीची यात्रा स्थगित करण्यात आली आहे. मंगळवार रात्रीपासूनच मंदिर प्रशासनाने देवीचे दर्शन बंद केले असून भाविकांना यात्रेसाठी न येण्याचे आवाहन केले आहे. तसेच उत्तराखंडमधील वाराणसीतील अनेक मंदिरेही बंद करण्यात आली असून दररोज संध्याकाळी होणारी गंगा आरती देखील अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे. या आरतीसाठी दररोज हजारो पर्यटक वाराणसीतील गंगा घाटावर उपस्थित राहतात.