हिंदुस्थानच्या दबावापुढे पाकिस्तान झुकले, मसूदच्या भावासह 44 दहशतवाद्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. जागतिक स्तरातून देखील हिंदुस्थानला पाठिंबा मिळत आहे. अखेर या दबावापुढे पाकिस्तान झुकला असून मंगळवारी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या भावासह 44 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री शेहरयार अफिरी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुलवामा हल्ला व एअर स्ट्राईकनंतर हिंदुस्थानकडून पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात दबाव टाकला जात आहे. त्यामुळेच पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई केली आहे. पाकिस्तानात आज क्रॅकडाऊन कारवाई करत वेगवेगळ्या भागातून 44 दहशतवाद्यांना अटक केली आहे. यात मौलाना मसूद अजहरचा भाऊ मुफ्ती अब्दूर रौफ व हमाद अजहर यांचा देखील समावेश आहे.  ही कारवाई अद्याप सुरू असून आणखी दहशतवाद्यांना अटक करण्यात येऊ शकते.