
देशातील भाषा वैविध्यता यादीत बंगळुरु पहिल्या स्थानावर असून तेथे 107 भाषा बोलल्या जातात. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 88 भआषा बोलणारी लोकं राहतात, असे या यादीतून स्पष्ट झाले आहे. बंगळुरुनंतर या यादीत नागालँडमधील दिमापूर आणि त्यानंतर आसाममधील सोनितपूरचा समावेश आहे.
2011 च्या जनगणनेवर आधारीत ही यादी आहे. बंगळुरूत 107 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. त्यात 22 स्थानिक बोलभाषांचा समावेश असून 84 इतर भाषा आहेत. बंगळुरुनंतर नागालँडमधील दिमापूर जिल्ह्यात 103 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. तर 101 भाषा बोलले जाणारे आसाममधील सोनितपूर या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात 88 भाषा बोलल्या जातात. तर पुण्यात 93 भाषा बोलल्या जातात. पश्चिम बंगालमधील जलपायगुडीमध्ये 98 भाषा बोलल्या जातात. मेघालयातील पूर्व खासी हिल भागात 96 भाषा बोलल्या जातात.दक्षिण दिल्लीत 97 भाषआ बोलल्या जातात.आसाममधील करबी अनलाँगमध्ये 95 भाषा बोलल्या जातात.तर दार्जिलिंगमध्ये 91 भाषा बोलल्या जातात.
पद्दुचेरीतील यानाम,बिहारमधील कैमूर,उत्तर प्रदेशमधील कानपूर,तामिळनाडूमधील अरियालपूर हे जिल्हे कमी भाषावैविध्य असलेले आहेत. या जिल्ह्यांमध्ये 20 पेक्षा कमी भाषा बोलल्या जातात. 2011 मधील जनगणनेवर आधारित ही यादी असून त्यात लोकसंख्येच्या प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या भाषांचा अभ्यास करून यादी बनवण्यात आली आहे, अशी माहिती तज्ञांनी दिली. यावर ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूशनच्या अनिवासी वरिष्ठ फेलो शमिका रवी आणि भारतीय सांख्यिकी संस्थेतील अर्थशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक मुदित कपूर यांनी विश्लेषण केले आहे. जगभरात न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक म्हणजे 600 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.



























































